शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:58 PM

सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रांतिक सदस्य भरत टाकेकर, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते उपस्थित होते.

ठळक मुद्दे तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व संघटनेचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला.

सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रांतिक सदस्य भरत टाकेकर, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते उपस्थित होते.बैठकीत सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व संघटनेचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील महिला काँग्रेसचे संघटन त्याचप्रमाणे विविध प्रकारचे सर्व सेल शहर काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस एन एस यु आय आधीच सर्व प्रकारचे सेल आहे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ तुषार शेवाळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी त्याचप्रमाणे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या संदर्भातले विविध प्रश्न आणि केलेल्या कामांचे कौतुक केले. सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सुदाम सांगळे यांनी तालुका काँग्रेस कमिटी काँग्रेस पक्ष अतिशय योग्य पद्धतीने तालुक्यात काम करीत असून काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी लागणारी पक्षाचे पाठबळ यासंदर्भात सर्व प्रकारच्या सुचना याला करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी या वेळेला मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना मध्ये सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी कशी करण्यात यावी त्याचप्रमाणे संघटन वाढण्यासाठी कशाप्रकारे काम करणार आहे. त्याचप्रमाणे महिला काँग्रेस युवक काँग्रेस त्याचप्रमाणे विविध प्रकारचे काँग्रेस पक्षाचे सेल यांच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्ष उभारणी करता एक प्रकारचे खूप चांगलं मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आली. कोरोना सारख्या महामारी संपूर्ण जग त्रस्त असून आपल्या काँग्रेस कमिटीने त्याचप्रमाणे राज्यात असेल ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना धीर देण्याचा प्रयत्न याला नक्की केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे वाटचालीकरता माननीय सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि जर आपल्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करायचे असतील त्याच प्रमाणे देशांमध्ये हे जातीयवादाचं तयार करून संपूर्ण देशाला विभाजनाच्या वाटेवरती असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खाली आणण्याकरता काँग्रेस च्या तळातील कार्यकर्त्यांपासून मनःपूर्वक काम करावे लागेल यावेळीही निश्चितपणे माननीय कार्याध्यक्ष यांनी सांगितले. नाशिक पदवीधर पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम अतिशय योग्य पद्धतीने लोकांची सेवा करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन याठिकाणी करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, सिन्नर तालुका समन्वय उदय जाधव, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, बाळासाहेब शिंदे, अश्फाक शेख, सचिन केदार, दामू शेळके, सिन्नर तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जाकीर शेख, रज्जाक सय्यद, शब्बीर शेख, आयुब शेख, इकबाल सय्यद, हेमंत क्षीरसागर, मल्हारी धनगर, सिन्नर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मीनाताई देशमुख, सिन्नर शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रत्नमला मोकळ, यांच्यासह सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस पूर्ण सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळण्यात आले. 

 

 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcongressकाँग्रेस