शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ऐक्याचे दर्शन : ‘इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:41 PM

धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते.

ठळक मुद्देताबुताचे मानकरी म्हणून खांदेकरीच्या भूमिकेत हिंदू कोळी बांधव अळीवच्या बियांपासून तयार झालेला व हिरवळीने नटलेला आकर्षक ताबूतशहीद-ए-आझम हजरत सय्यद इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आशुरा’

अझहर शेख, नाशिक : येथील सारडासर्कल भागातील हजरत इमामशाही दर्ग्याच्या आवारात दरवर्षी इस्लामी नववर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात 'मुहर्रम'मध्येहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन पारंपरिक प्रथेतून घडते. येथे मानाचा अळीवच्या हिरवळीचा ताबूत उभारला जातो. या ताबूताचे कारागिर जरी मुस्लीम असले तरी पारंपरिक प्रथेप्रमाणे मुहर्रमच्या दहा तारखेला (आशुरा दिन) ताबूतचे खांदेकरी होण्याचा मान आदिवासी कोळी हिंदू बांधवांना दिला जातो. उद्या शुक्रवारी (दि.२१) दर्ग्याच्या आवारात यात्रा भरणार असून ताबूत दर्शनासाठी दूपारी चार वाजेनंतर मैदानात हिंदू भाविक घेऊन येतील.बांबूंच्या कामट्यांचा वापर करत त्याभोवती कापूस लावून कापसात अळीवच्या बियांची पेरणी आठवडाभरापुर्वी करण्यात आली होती. यावर दररोज पाण्याचा फवारा मारला जात होता. हिरवळीने ताबूत सजला आहे.

धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मुहर्रमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते.

नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पिहल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ च्या नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात. या तीन दिवसांमध्ये येथे यात्रोत्सव भरविला जातो. या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे अळीवच्या बियांपासून तयार झालेला व हिरवळीने नटलेला आकर्षक ताबूत. हा ताबूत वर्षानुवर्षांपासून येथील सय्यद कुटुंबीय तयार करत आले आहे अन् या ताबुताचे मानकरी म्हणून खांदेकरीच्या भूमिकेत हिंदू कोळी बांधव राहिले आहेत. या शेकडो वर्षे जुन्या पारंपरिक प्रथेतून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही.   ‘आशुरा’ दिवशी शहीद-ए-आझम हजरत सय्यद इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लीम समाजबांधव सामूहिकरीत्या शरबत, दूध कोल्ड्रिंक्सचे प्रसाद म्हणून वाटप करतात. या दिवशी इमामशाही दर्गाच्या आवारात हिंदू बांधव हिरवळीच्या ताबुताचे खांदेकरी होऊन संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत अनवाणी पायाने उभे राहतात.

टॅग्स :Nashikनाशिकmuharramमुहर्रमHinduहिंदू