पिंपळगावी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:36 PM2019-12-09T14:36:30+5:302019-12-09T14:36:36+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.

 Siege of Pimpalgavi farmers | पिंपळगावी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

पिंपळगावी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

Next

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.
सकाळी दहा वाजता व्यापारी व काही शेतकºयांच्या उपस्थितीत ई-नाम प्रणाली प्रशिक्षणास पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला. प्रशिक्षक रंगनाथ कटरे, सभापती आमदार दिलीप बनकर, संचालक सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, बापूसाहेब पाटील, लक्ष्मण निकम, नारायण पोटे, सचिव संजय पाटील आदींसह पणन विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान कटरे म्हणाले की, ई-नाम प्रणालीनुसार बाजार समितीत शेतमाल विक्र ीसाठी यापुढे शेतकर्यांना आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत शेतकºयांच्याच शेतीमालाचा लिलाव बाजार आवारावर होईल. तसेच शेतमाल खरेदी करणार्या व्यापार्यांना ही नोंदणी आवश्यक असून, नोंदणी केलेले व्यापारीच लिलावात बोली बोलू शकतील. ई-नाम लिलाव पद्धतीनुसार प्रथम शेतकर्यांच्या मालाचा दर्जा ठरवून त्या शेतमालाचा किमान भाव ठरविला जाईल. किमान बाजारभाव ठरल्यानंतरच व्यापाºयांना या शेतमालाची बोली लावता येणार आहे. या पद्धतीतून स्पर्धा होऊन शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. या योजनेद्वारे शेतकर्यांनी आपल्या नावाची नोंदणी एका बाजार समतिीत केली तरी देशभरातील कोणत्याही बाजार समतिीत शेतकरी आपला शेतमाल विक्र ी करू शकतील. तसेच व्यापार्यांनीही आपल्या नावाची नोंदणी केल्यास ते देशातील कोणत्याही बाजार समितीत शेतमाल खरेदी करू शकतील, असे कटरे यांनी स्पष्ट केले.
दीड तास चाललेल्या प्रशिक्षण व प्रात्यिक्षकानंतर व्यापारी, शेतकर्यांनी या प्रणालीला कडाडून विरोध केला. या प्रणालीनुसार आम्हास काम करायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत प्रशिक्षक रंगनाथ कटरे यांना घेराव घातला. त्यामुळे केंद्र सरकारचा ई-नामचा फतवा महाराष्ट्रातील बाजार समितीत कार्यान्वित होतो की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.ई-नामबाबत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पणन विभागाचे अधिकारी रंगनाथ कटरे या विरोधामुळे हतबल झाले. त्यांनी सर्व प्रकारे व्यापारी व शेतकºयांना या प्रणालीतील फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेषत: व्यापाºयांनी विरोधाची ठाम भूमिका घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. त्यांनीही या पद्धतीस विरोध दर्शविला. बाजार समित्या शेतकर्यांसाठी काम करतात. त्यामुळे शेतकºयांनी ही पद्धत स्वीकारली तर आमची हरकत नाही, असेही बनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title:  Siege of Pimpalgavi farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक