सिडकोत पुन्हा डेंग्यूसदृश आजाराने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: November 6, 2015 21:43 IST2015-11-06T21:41:52+5:302015-11-06T21:43:47+5:30

सिडकोत पुन्हा डेंग्यूसदृश आजाराने तरुणाचा मृत्यू

Siddkot again dies of dengue-like disorders by the youth | सिडकोत पुन्हा डेंग्यूसदृश आजाराने तरुणाचा मृत्यू

सिडकोत पुन्हा डेंग्यूसदृश आजाराने तरुणाचा मृत्यू

सिडको : येथील उत्तमनगर बुरकुले हॉलच्या पाठीमागे राहणाऱ्या तरुणाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिडको भागात काही दिवसांपूर्वीच एका महिलेचे डेंग्यूसदृश आजाराने निधन झाले. या पाठोपाठ पुन्हा तरुणाचा मृत्यू झाला. सिडकोतील उत्तमनगर बुरकु ले हॉलच्या पाठीमागे व्यावसायिक जयमुखभाई मेतलिया हे कुटुंबासमवेत राहतात. रविवारी (दि. १ नोव्हेंबर) जयमुखभाई यांचा एकुलता एक मुलगा धर्मेश (१९) याची तब्येत बिघडल्यामुळे त्यास बाळासाहेब पाटील यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची शुक्रवारी (दि.५) प्राणज्योत मावळली. मयत धर्मेश हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Siddkot again dies of dengue-like disorders by the youth