बोरस्तेंसह तिघे न्यायालयास शरण
By Admin | Updated: May 30, 2014 01:07 IST2014-05-29T22:29:43+5:302014-05-30T01:07:47+5:30
जामिनावर मुक्तता

बोरस्तेंसह तिघे न्यायालयास शरण
जामिनावर मुक्तता
नाशिक : डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या मुलाच्या अपहरण प्रकरणातील संशयित शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, डी़ जी़ सूर्यवंशी, आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक रवि पाटील हे आज जिल्हा न्यायालयास शरण आले़ वैयक्तिक १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची न्यायालयाने मुक्तता केली़
सदर संशयितांविरोधात डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक अर्चना राजेंद्र कोठावदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली होती़ सुमारे एक महिन्यापूर्वी डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान त्यांचा मुलगा प्रतीक राजेंद्र कोठावदे याचे २६ एप्रिल २०१४ रोजी पाथर्डी फ ाटा येथून आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवलीचे नगरसेवक रवि पाटील, नाशिकचे शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, शिवसेनेचे नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशी यांच्यासह सात-आठ जणांनी सफे द रंगाच्या मर्सिडिजमधून अपहरण केल्याचे त्यात म्हटले होते़
या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले संशयित चौघेही जण आज दुपारी न्या़ वानखेडे यांच्यासमोर हजर झाले़ न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली़