शंभूराजांनी शिवरायांकडून गिरवले राज्यकारभाराचे धडे: कानिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:17 IST2019-01-20T00:17:04+5:302019-01-20T00:17:21+5:30
संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानपणापासून करत आले, असे प्रतिपादन शाहीर प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.

शंभूराजांनी शिवरायांकडून गिरवले राज्यकारभाराचे धडे: कानिटकर
नाशिक : संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानपणापासून करत आले, असे प्रतिपादन शाहीर प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.
संस्कृती नाशिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिरात धगधगते शंभूपर्व या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना प्रा. कानिटकर बोलत होते. यावेळी प्रा. कानिटकर म्हणाले की, आग्रा येथे बादशहा औरंगजेब याच्या दरबारात संभाजी राजांची औरंगजेबसमवेत अनेकवेळा भेट झाली. आग्रा येथून परत स्वराज्यात आल्यावर त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी मनसबदारी स्वीकारून वºहाड प्रांतात अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. त्यानंतर ते पुन्हा रायगडावर आले.
याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा संभाजी महाराजांच्या वाढदिवसाला झाला. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना युवराजपदाचा मान देण्यासाठी ही तिथी निवडली, असेही प्रा. कानेटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय चव्हाण आणि मिलिंद खाडिलकर यांनी ‘ध्येय मंत्रा’चे गायन केले. कार्यक्रमाचे आयोजक शाहू खैरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.