शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:01 IST

नाशिक शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. 

नाशिक : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. शहरातील सर्व शाळांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट दिसून आला. महापालिकेच्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी व विनाअनुदानित १७२ अशा सर्व २७५ शाळांनी प्रवेशद्वारावरच सुटी असल्याचे फलक लावले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी (दि. १४) सायंकाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना याबाबत सूचना देऊ शकले नव्हते. त्यामुळे या आदेशाविषयी अनभिज्ञ पालक सोमवारी सकाळी त्यांच्या घेऊन शाळेत आले. शाळा बंद अशल्याची माहिती मिळताच ते माघारी परतले. शैक्षणिक संस्थांनी एसएमएस, ई-मेल, व्हॉट््सअ‍ॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना शाळा बंद राहणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असतानाही काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन याबाबत शहानिशा करून घेतली. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली असली तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सुरक्षारक्षकांना सुटी देण्यात आलेली नसल्याने शाळांचे शिक्षणेत्तर सर्व कामकाज नियमितपणे सुरू होते. 

विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगितकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यशासनाने १७ ते ३१ मार्च दरम्यान विद्यापीठांच्या होणाऱ्या सर्व लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा स्थगित  करण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित करतानाच १ एप्रिल २०२० पासूनच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे २७ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी