राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसमध्ये फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST2018-02-27T00:19:51+5:302018-02-27T00:19:51+5:30
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात ही निवड घोषित करून नियुक्तीपत्र दिले.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसमध्ये फेरबदल
कळवण : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात ही निवड घोषित करून नियुक्तीपत्र दिले. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांसाठी अनेक इच्छुकांनी कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व पदाधिकाºयांची भेट घेऊन तालुकाध्यक्षपदासह जिल्हा पदाधिकारी होण्याची इच्छा प्रकट केली होती. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्याकडे इच्छुक कार्यकर्त्यांच्या नावांची शिफारस केली होती. दरम्यान नाशिक येथे राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष कडलग यांनी जिल्हा प्रभारी आमदार पाटील, प्रदेशाध्यक्ष कोते यांच्या सूचनेनुसार कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी वाघ, प्रसिद्धी-प्रमुखपदी पंकज रौंदळ, तर संदीप पगार यांना शहराध्यक्षपदाचे नियुक्तीचे पत्र दिले.