शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:00 AM

गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेकायदेशीर वसुलीला चाप बसणार आहे.

गंगापूर : गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेकायदेशीर वसुलीला चाप बसणार आहे.  नाशिक तालुक्यातील गिरणारे बाजारपेठेत टमाटा खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून व्यापारी येत असतात आणि स्थानिक शेतकºयांचा टमाटा खरेदी करून दुसºया राज्यात पाठवतात त्यामुळे याठिकाणी स्थानिक शेतकºयांना जागेवरच चांगला भाव मिळत असल्याने दरवर्षी शेतकरी या ठिकाणी व्यापाºयांची वाट बघतात. मात्र गावातील काही समाजकंटक व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून व्यापाºयांना धमकावले जाऊन त्यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या कराव्यतिरिक्त जास्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त झाली होती, त्यामुळे गिरणारे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून टमाटा बाजारात व्यापाºयांकडून परस्पर कोणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव बुधवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. गिरणारे बाजारात हंगामात सरासरी एक लाख क्रेट टमाट्याची आवक होते. अनेक व्यक्ती व संस्था व्यापाºयांकडून परस्पर पैशांची वसुली करतात, यामुळे टमाट्याच्या बाजारावर विपरित परिणाम होतो. गिरणारे टमाटा मार्केट हंगामास प्रारंभ झाला असून, या पार्श्वभूमीवर गिरणारेची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायती व्यतिरिक्त अन्य कुणीही बाजार वसुली करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या संचालकांनी विश्वासात न घेता परस्पर बाजाराचा लिलाव जाहीर केला आहे. तो बेकायदेशीर असून, त्याबाबत दाद मागण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनीही त्यास विरोध केला. यावेळी निवृत्ती घुले, पुंडलिकराव थेटे, भिका भाऊ थेटे, नितीन गायकर, महेंद्र थेटे, हरिभाऊ गायकर, रोहन थेटे आदी उपस्थित होते.गिरणारे टमाटा बाजार शेतकरी व व्यापाºयांना रस्ते, वीज, पाणी या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात येणार आहे. हंगामातील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी येण्या-जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  - अलका दिवे, सरपंच

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत