श्री स्वामी सागरानंद आश्रमात श्रीजगदंबा शतचंडी महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:11 IST2021-01-29T14:11:45+5:302021-01-29T14:11:53+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीस्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात श्रीजगदंबा त्रिगुणात्मिका शतचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

Shrijagadamba Shatachandi Mahayagya at Shri Swami Sagarananda Ashram | श्री स्वामी सागरानंद आश्रमात श्रीजगदंबा शतचंडी महायज्ञ

श्री स्वामी सागरानंद आश्रमात श्रीजगदंबा शतचंडी महायज्ञ

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीस्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात श्रीजगदंबा त्रिगुणात्मिका शतचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी श्रीतपोनिधी पंचायती निरंजनी अखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती, श्रीमहंत सर्वानंद सरस्वती, श्रीमहंत नाथानंद सरस्वती, श्रीमहंत सिध्देश्वरानंद सरस्वती आदी उपस्थित होते. पुजेचे पौराहित्य वेदमुर्ती डॉ. पंकजशास्त्री घेवारे व त्यांचे सहकारी ब्रम्हवृंदाच्या उपस्थितीत पार पडला.  देश कोरोनामुक्त व्हावा या सद्हेतुने यज्ञाचे आयोजन केले असल्याचे पुरोहित डॉ.पंकजशास्त्री घेवारे यांनी सांगितले.यावेळी गुरुवर्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे शिष्यत्व विक्रम नागरे यांनी घेतले. तर गुरुदक्षिणा म्हणुन आश्रमास एक काळी कपिला गाय दान म्हणुन दिली तर गौशाळेसाठी जागा देण्याचा संकल्प ही सोडण्यात आला. या यज्ञासाठी गुरुवर्य स्वामी सागरानंद आश्रमात देवदेवता फोटो धगधगते यज्ञकुंड व भोवती साधुमहंत व विक्रम नागरे सोवळ्यात होते. शतचंडी पुजा यज्ञविधी झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी विक्रम सुदाम नागरे, नगरसेविका इंदुबाई नागरे, विक्रम नागरे, आरती नागरे आदी उपस्थित होते.

Web Title: Shrijagadamba Shatachandi Mahayagya at Shri Swami Sagarananda Ashram

टॅग्स :Nashikनाशिक