सुरगाण्यात श्रीदत्त जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:20 IST2020-12-29T17:19:12+5:302020-12-29T17:20:22+5:30
सुरगाणा : तालुका व परिसरात श्रीदत्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

सुरगाणा येथील मुख्य बाजारपेठेतील मंदिरातील श्री गुरुदत्तांची प्रसन्न मूर्ती.
ठळक मुद्देमंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
सुरगाणा : तालुका व परिसरात श्रीदत्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
सुरगाणा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्रीगुरुदत्त मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यावेळी महाआरती करण्यात आली. आरती नंतर प्रसाद व खिरापत वाटण्यात आली. नागरिकांनी श्रीदत्ताचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.
त्याचप्रमाणे तालुक्यातील ठिकठिकाणी असलेल्या श्रीगुरुदत्त मंदिरात भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचनाचा लाभ घेऊन श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी केली. तर वडपाडा येथे हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.