श्री सप्तशृंगी माता मंदिर नूतनवर्ष स्वागतासाठी २४ तास राहणार खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 18:40 IST2020-12-29T18:39:57+5:302020-12-29T18:40:24+5:30
वणी : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी होणारी गर्दी विचारात घेवून मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणशर आहे.

श्री सप्तशृंगी माता मंदिर नूतनवर्ष स्वागतासाठी २४ तास राहणार खुले
वणी : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी होणारी गर्दी विचारात घेवून मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणशर आहे.
विश्वस्त मंडळाने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास दर्शनासाठी सुरू ठेवणे बाबतचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री श्री भगवती मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू राहणार असून, भाविकांनी कोविड-१९ संदर्भीय आवश्यक त्या खबरदारीसह अति गर्दी टाळून सामाजिक अंतर जपावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनचं मंदिरात प्रवेश करावा, तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.