श्री संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 19:06 IST2020-08-16T19:05:53+5:302020-08-16T19:06:28+5:30

नाशिक : शहर नाभिक समाज युवक मंडळाचे वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रविवारी (दि.१६) श्रावण वद्द द्वादशी रोजी सकाळी ११ वाजता न्हावी पार,रामसेतू जवळ गोदाकाठ येथे संपन्न झाली.

Shri Sant Sena Maharaj Punyatithi Celebration | श्री संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी

श्री संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी

ठळक मुद्देकार्याध्यक्ष अनंत सोनवणे यांनी आभार प्रदर्शान केले.

नाशिक : शहर नाभिक समाज युवक मंडळाचे वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रविवारी (दि.१६) श्रावण वद्द द्वादशी रोजी सकाळी ११ वाजता न्हावी पार,रामसेतू जवळ गोदाकाठ येथे संपन्न झाली.
या निमित्ताने श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नाभिक समाज कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते अविनाश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवक मंडळाचे माजी अध्यक्ष कैलास वाघ, पद्माकर वाघ, नामदेव गायकवाड, प्रितीश सोनवणे,भाऊ वैद्य, सुयोग चौधरी, विक्र म सोनवणे आदींनी प्रतिमा पूजन केले.
या प्रसंगी संतोष वाघ यांनी आपल्या भाषणातून श्री संतसेना महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. नितीन वाघ यांनी कृती समितीच्या कार्याची माहिती दिली. कार्याध्यक्ष अनंत सोनवणे यांनी आभार प्रदर्शान केले. (फोटो १६ संतसेना)

Web Title: Shri Sant Sena Maharaj Punyatithi Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.