आदिवासी पाड्यावर झाला शाळेचा श्री गणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:33 PM2020-08-10T17:33:08+5:302020-08-10T17:34:17+5:30

घोटी : आदिवासी दिनाचे औचित्य साधून घोटी येथील सखी सोशल ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या-पाड्यावर जाऊन आदिवासी दिन अनोख्या स्वरूपात साजरा करण्यात आला.

Shri Ganesha was born in a tribal village | आदिवासी पाड्यावर झाला शाळेचा श्री गणेशा

आदिवासी पाड्यावरील घराघरात जाऊन शाळेचा श्री गणेशा करतांना व चिमुकल्या मुलांना शैक्षणिक साहित्य प्रसंगी सखी सोशल ग्रुपच्या वैशाली गोसावी, दीपा राय, अलका गोºहे, गायत्री पवार, सुनीता सिंघल आदी.

Next
ठळक मुद्दे महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे महत्व ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले

घोटी : आदिवासी दिनाचे औचित्य साधून घोटी येथील सखी सोशल ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या-पाड्यावर जाऊन आदिवासी दिन अनोख्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
सखी सोशल ग्रुपच्याकडून वर्षभरात विविध आदिवासी भागात जावून आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यापासून तर त्या भागातील महिलांना स्वत:च्या पायावर ऊभे राहण्यापर्यंत विविध योजनांची माहिती यांच्या माध्यमातून दिल्या जाते. इगतपुरी तालुक्यातील डहाळेवाडी, खंबाळेवाडी, उघडेवाडी या ठिकाणी १००च्या वर महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे महत्व ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले व त्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेंच चिमुकल्यांच्या शाळा बंद आहेत. परंतु आदिवासीदिनाचे औचित्य साधून त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आला.
याप्रसंगी सखी सोशल ग्रुपच्या वैशाली गोसावी, दीपा राय, अलका गोºहे, गायत्री पवार, सुनिता सिंघल आदी ग्रुपच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
 

Web Title: Shri Ganesha was born in a tribal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.