श्री गजानन महाराज प्रकट दिन त्र्यंबक नगरीत उत्साहाने साजरा
By Admin | Updated: February 13, 2015 01:29 IST2015-02-13T01:29:24+5:302015-02-13T01:29:54+5:30
श्री गजानन महाराज प्रकट दिन त्र्यंबक नगरीत उत्साहाने साजरा

श्री गजानन महाराज प्रकट दिन त्र्यंबक नगरीत उत्साहाने साजरा
त्र्यंबकेश्वर : श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा श्री गजानन महाराज मठामध्ये ३० हजार भक्तांनी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. उत्सवाच्या काळामध्ये काकडा आरती, श्रींना अभिषेक, सकाळी सात आरती त्यानंतर सामुदायिक विजय ग्रंथाचे पारायण गाथा भजन, तसेच आरती तर सायंकाळी हरिपाठ सामुदायिक सांज आरती तसेच रात्री भजनाच्या आयोजन करण्यात आले होते.
श्रींच्या प्रगटदिन उत्सवानिमित्त सकाळी दहा ते बारा भजन होऊन दुपारी बारा वाजता ब्रह्मवंदांच्या मंत्र घोषात व टाळ मृदंगाच्या गजरात गुलाल पुष्पांची उधळण करून श्रींच्या जय घोषात १३७ वा प्रगट दिन उत्सव साजरा झाला.
येथे येणाऱ्या भक्तांकरिता श्री संस्थेद्वारा निवासाची व भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. (वार्ताहर)