श्रावणी सोमवारसाठी तीनशे गाड्यांचे नियोजन : बाह्य भागात वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 19:36 IST2017-08-05T19:36:19+5:302017-08-05T19:36:26+5:30

श्रावणी सोमवारसाठी तीनशे गाड्यांचे नियोजन : बाह्य भागात वाहनतळ
लोकमत न्यूज नेटवर्क :
नाशिक : तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे होणाºया गर्दीचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने तब्बल तीनशे बसेसचे नियोजन केले आहे. बह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे नाशिकचे मेळा बसस्थान, निमाणी व नाशिकरोड येथील बसस्थानकावरून भाविकांसाठी १५० बसेसची सोय करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील विविध भागातून येणाºया भाविकांसाठीही १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती, अशी माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली आहे.
त्र्यंबकेश्वरकडे जाणारी खासगी वाहने या दोन्ही दिवशी खंबाळे, अंबोली व पहिने येथे थांबविली जाणार आहेत. खंबाळे ते त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी गर्दीचे नियोजन आणि पोलीस सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे यामिनी जोशी यांनी स्पष्ट केले आहे. तर नाशिकच्या मेळा बसस्थानकातून तसेच नाशिकरोड व निमाणी येथून प्रवाशांसाठी रविवारी दुपारी ४ वाजेपासून शून्य प्रतीक्षेच्या कालावधीनुसार बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घोटी, इगतपुरी व सिन्नर भागातूनही फेरीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने या सर्व मार्गांवर प्रवासी हात देतील तेथे बस थांबवून भाविकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे. खंबाळे, अंबोली व पहिने या तिन्ही वाहनतळांच्या मार्गावर तीन आपत्कालीन सुविधा वाहन उपलब्ध असणार असून, वाहनतळांवर तात्पुरते मदत केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. एसटीच्या वाहक-चालकांव्यतिरिक्त वाहतूक निरीक्षक व अन्य कर्मचारी असे मिळून जवळपास ७० कर्मचारी वाहतूक मार्गावर असणार आहेत.