सप्तश्रृंगगडावर श्रमदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:28 IST2019-10-01T18:28:04+5:302019-10-01T18:28:29+5:30

सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.

Shraddan Campaign on the Seven Seaside | सप्तश्रृंगगडावर श्रमदान मोहीम

सप्तश्रृंगी गड येथे ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत परिसराची स्वच्छता करताना ईशाधिन शेळकंदे व अन्य अधिकारी.

ठळक मुद्देनवरात्रोत्सव : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदारांचा सहभाग

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.
प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागल्याने पर्यावरण रक्षण व जनजागृती करण्यासाठी शासनाच्या निर्णयाला साथ सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा ठरावच ग्रामसभेत संमत करण्यात आला असून प्लास्टिक आढळल्यास अथवा वापरल्यास ५०० ते ५००० रु पये दंड आकारण्यात येत आहे. एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी बाबत संपूर्ण पाहणी केली. यावेळी पहिल्या पायरी लगतच आडोशाला ग्रामपंचायतीच्या एका भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसल्याने त्यांनी स्वत: साफसफाई करण्यास सुरु वात केली. यावेळी उपस्थित कळवणचे तहसीलदार बी. एन. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम व सुरगाणा तहसीलदार सूर्यवंशी यांनी श्रमदानास सुरु वात केली. सलग दोन तास श्रमदान करीत सरपंच, सदस्य, कळवण पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामस्थ व कर्मचारी आदींनी जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा गोळा करीत श्रमदान केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, तलाव स्वच्छता व परिसर स्वच्छता याबबत प्रत्येक्ष भेट देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या.

Web Title: Shraddan Campaign on the Seven Seaside