पैसे दाखवा, तिकीट मिळावा!
By Admin | Updated: January 4, 2017 00:04 IST2017-01-04T00:02:54+5:302017-01-04T00:04:04+5:30
कॉँग्रेस ‘निष्ठावंत’ बरसले : शहर नेतृत्वावर बैठकीत कडाडून टीका

पैसे दाखवा, तिकीट मिळावा!
नाशिक : कॉँग्रेसचे शहराचे ज्येष्ठ नेते आता पहिल्यासारखे राहिलेले नाही, गरिबांचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या या पक्षात महापालिका निवडणूक लढविण्यासाठी जाणाऱ्यांना पैसे किती आहेत, तसेच तुमच्याबरोबर अन्य चार उमेदवार असतील तरच या, असे अजब पद्धतीने सांगितले जात असून, सध्या कॉँग्रेसमध्ये पैसे दाखवा, तिकीट मिळवा अशा प्रकारचे उद्योग सुरू झाल्याची घणाघाती टीका निष्ठावान कॉँग्रेस गटाने केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे छायाचित्र लावून निवडणुका लढविण्याची तयारी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कॉँग्रेसमध्ये अगोदरच असलेली गटबाजी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आली असून, शहराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात निष्ठावान म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी वावरे लेनमधील मंगल कार्यालयात रात्री बैठक घेतली. या बैठकीत शहराध्यक्षांची गटबाजी आणि परपक्षधार्जिणी भूमिका असल्याचा आरोप करतानाच पक्षाने उमेदवारी दिली नाही.