शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:33 IST2017-10-31T00:32:31+5:302017-10-31T00:33:51+5:30
शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.

शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता
नाशिक : शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे. नाशिक महानगरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सफाई कामगारांची संख्या १९३३ इतकी असून, शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत चाललेला असून, त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुहे उर्वरित सफाई कामगारांवर चार हजार सफाई कर्मचाºयांचा कामाचा बोजा वाढणार आहे. इतकी कमी कर्मचाºयांमध्ये शहराची स्वच्छता होणे अशक्य आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छतेमुळे चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया वैगेरे आदी आजार होऊ शकतात. मागील महासभेत सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडून सफाई कामगार आउट सोर्सिंग भरतीला तीव्र विरोध करण्यात आला. वास्तविक राज्य शासन अन्य ठिकाणी शासकीय आदेशानुसार सफाई कामगारांच्या भरतीमध्ये मेहतर वाल्मीक समाजाला प्राधान्य देत आहे. परंतु नाशिक महापालिका सफाई कामगार भरतीला परवानगी देत नाही. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग, दीपक चंडालिया, जयेश बहारे, ईश्वर गहलीत, साई उमरवाल आदींच्या स्वाक्षºया असून, सदर निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.
वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती नाही
नाशिक महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती झालेली नाही. मागील कुंभमेळ्यात सफाई कामगारांची आवश्यकता होती. परंतु प्रशासनाने भरती न करता सफाई काम ठेकेदार पद्धतीने करण्यात येते. वास्तविक पाहता मेहतर वाल्मीकी समाज वंश परंपरागत शासन सेवेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.