मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती देणाऱ्यांना प्रशासक प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार होते. मात्र, भाविकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दिवसभरात अवघ्या ८० मूर्ती संकलित झाल्याची माहिती अभियंता सत्यवान गायकवाड यांनी दिली. दरम्यान, चांदवडच्या पुरातन रंगारी तलावात श्री गणपती विसर्जन भाविकांनी मनोभावे केले तर विसर्जनासाठी पोलीस कार्यालयाच्या मार्फत पट्टीच्या पोहणाऱ्या पोलीस मित्रांनी गणेश विसर्जन उत्साहात पार पाडले. गणरायाला वाजतगाजत न्यायला शासनाने काही निर्बंध घालून दिल्याने काही भाविकांनी लहान ढोल-ताशा व लाऊडस्पीकरचा वापर केला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक गजानन राठोड, पोपट कारवाल, विशाल सणस व चाळीस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
-
फोटो -२० चांदवड गणेश मूर्ती
200921\20nsk_31_20092021_13.jpg
फोटो -२० चांदवड गणेश मूर्ती