शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने, कारखाने लक्ष्य : मद्याच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:07 IST

दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास

ठळक मुद्देगज कापून कंपनीत ७० हजाराची चोरी कंपनीला सुट्टी असल्याचा गैरफायदा

नाशिक : शहरात लॉकडाउन शिथिल झाल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुकाने, कारखाने, बॅँका, गुदामे चोरट्यांकडून फोडले जात असून लाखो रूपयांचा माल गायब केला जात आहे.मद्याचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात शनिवारी (दि.८) मध्यरात्री घडली. याप्रकरणी किशोर बबन ठाकरे यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हसरूळच्या हद्दीत दिंडोरी रोडवर समृद्धी अपार्टमेंट येथे दिंडोरी लिकर्स वाईन शॉप आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरील लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खिडकीचे गज कापून कंपनीत ७० हजाराची चोरीनाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत चोरीचे प्रकार सुरू असून शनिवारी (दि.८) रात्री एका कंपनीचे खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ७० हजार रूपये किंमतीचे १५० किलो कॉपर चोरून नेले. याप्रकरणी सतीश राजपुत (रा. एकतानगर, उत्तमनगर) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार कंपनीला सुट्टी असल्याचा गैरफायदा घेत शुक्र वारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या प्रसाधनगृहावरुन आत प्रवेश केला. स्टोर रुमच्या खिडकीचे गज कापून तेथे ठेवलेले ७० हजार रूपये किंमतीचे १५० किलो कॉपरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी