मुखेड फाट्यावर फोडली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:43 IST2019-09-21T19:43:35+5:302019-09-21T19:43:57+5:30

देशमाने : मुखेड फाट्यावर (ता. येवला) पाच महिन्यानंतर पुन्हा दोन दुकाने फोडली. यातील एका व्यावसायिकाचे दुकान दुसऱ्यांदा फोडण्यात आले आहे.

Shops on the facade | मुखेड फाट्यावर फोडली दुकाने

मुखेड फाटा, ता. येवला येथील ओम अ‍ॅग्रो एजन्सी या दुकानाचे चोरट्यांनी वाकविलेले शटर.

ठळक मुद्देदेशमाने : नाकाबंदी पुन्हा सुरू करण्याची मागणी

देशमाने : मुखेड फाट्यावर (ता. येवला) पाच महिन्यानंतर पुन्हा दोन दुकाने फोडली. यातील एका व्यावसायिकाचे दुकान दुसऱ्यांदा फोडण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास येवला - नाशिक महामार्गावरील मुखेड फाट्यावरील ओम अ‍ॅग्रो एजन्सी व सोमनाथ घुले यांचे जनरल स्टोअर अश्या दुकानांचे शटर वाकवून आतील माल व रोख रक्कम एक हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे.
दरम्यान, महामार्गावर सातत्याने होणाºया चाºयामुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड फाटा येथील रात्रीच्या सुमारास बंद केलेली नाकाबंदी पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पठाडे हे करत आहे.
 

Web Title: Shops on the facade