दिंडोरी तालुक्यात दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:53 IST2020-03-22T22:52:11+5:302020-03-22T22:53:22+5:30
दिंडोरी : शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐतिहासिक बंद पाळला जात असून, सर्वत्र शुकशुकाट असून, लोक घराचे दरवाजे बंद करून घरातच राहून कोरोना विरु द्धच्या युद्धात सरकारच्या निर्णयाला साथ देत आहे.

दिंडोरी बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐतिहासिक बंद पाळला जात असून, सर्वत्र शुकशुकाट असून, लोक घराचे दरवाजे बंद करून घरातच राहून कोरोना विरु द्धच्या युद्धात सरकारच्या निर्णयाला साथ देत आहे.
नाशिक, दिंडोरी, वणी, नाशिक, पेठ, पिंपळगाव, सापुतारा या प्रमुख रस्त्यांसह सर्व रस्त्यांवर सकाळपासून वाहनांची वर्दळ पूर्णत: बंद झाली आहे. लांब पल्ला वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पेट्रोल पंप परिसरात वाहने लावून देत सदर मोहिमेत सहभागी झाले आहे.
दिंडोरी, वणी, खेडगाव, लखमापूर, मोहाडी, ननाशी, जानोरी, वरखेडा आदींसह सर्वच गावातील दुकाने बंद असून, नागरिकही घराबाहेर पडलेले नाही. दिंडोरी शहरात दोन-तीन मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत.