शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन शॉपिंग पालिकेच्या रडारवर

By admin | Updated: February 27, 2015 00:07 IST

एलबीटी चुकवेगिरी : मनपाने बजावली अ‍ॅमेझॉनला नोटीस, अन्य डिलर्सची शोधमोहीम

नाशिक : ज्यांनी रितसर नोंदणी केली त्यांच्याकडून एलबीटीची वसुली होते, परंतु आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात रोज लाखोंची उलाढाल होत असताना महापालिका मात्र त्याबाबत आजवर अनभिज्ञ होती. राज्यातील औरंगाबाद महापालिकेने आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणारी करचुकवेगिरी उघडकीस आणल्यानंतर नाशिक महापालिका सतर्क झाली आणि आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उलाढाल करणाऱ्या कंपन्या, डिलर्स पालिकेच्या रडारवर आले. त्यानुसार महापालिकेने अ‍ॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस प्रा. लिमिटेड या कंपनीला नोटीस बजावली असून, अन्य डिलर्स-कंपन्यांच्या कार्यालयांची शोधमोहीम सुरू केली आहे. इंटरनेटच्या मायाजालामुळे आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या घरपोहोच पाहिजे ती वस्तू प्राप्त होत असते. त्यामुळे ग्राहकांकडून आॅनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. संबंधित कंपन्यांकडे आॅनलाइन मालाची नोंदणी केली की त्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत मालाचे पार्सल कंपनीच्या डिलर्समार्फत अथवा खासगी कुरिअरमार्फत घरपोहोच मिळते. आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात रोज लाखोंची उलाढाल होत असली तरी त्याची कुठेही नोंद महापालिकेच्या दफ्तरी नाही. शहरात बाहेरून येणाऱ्या मालावर एलबीटी आकारणी केली जाते. महापालिकेकडे त्यासंबंधी विवरणपत्र दाखल करणाऱ्या व्यावसायिकांकडून एलबीटीची वसुली केली जाते, परंतु आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात बाहेरून येणाऱ्या मालांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधीचा महसूल बुडतो आहे. अगोदरच आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या महापालिका पै-पै जमा करण्यासाठी झगडत असताना महापालिकेला आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळण्याची शक्यता आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच औरंगाबाद महापालिकेने एका व्यावसायिकाकडून आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणारी करचुकवेगिरी उघडकीस आणल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली आणि महापालिकेने शहरात आॅनलाइन शॉपिंगची उलाढाल करणाऱ्या कंपन्या आणि डिलर्सची शोधमोहीम सुरू केली. त्यासाठी महापालिकेने इंटरनेटही पालथे घातले. त्यानुसार महापालिकेने शहरात उलाढाल करणाऱ्या अ‍ॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस प्रा. लिमिटेड या डिलर्सचा शोध घेऊन त्याला आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)