गोविंदनगर भागात दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:02 IST2020-07-25T20:13:14+5:302020-07-26T00:02:42+5:30
नाशिक : गोविंदनगर भागातील मार्क मॉल सुपरमार्के ट येथे चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्के टचे बंद शटर वाकवून कॅश काउंटरमधून २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोविंदनगर भागात दुकानात चोरी
ठळक मुद्देमुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गोविंदनगर भागातील मार्क मॉल सुपरमार्के ट येथे चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्के टचे बंद शटर वाकवून कॅश काउंटरमधून २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सुपर मार्केटचे मालक उंटवाडीतील जगतापनगर येथील जितेंद्र मेतकर यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर, गोविंदनगर, जुने सिडको आदि भागांमध्ये भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.