मनमाड येथे दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:34 IST2020-02-11T23:25:25+5:302020-02-11T23:34:14+5:30
मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मनमाड येथे दुकानाला आग
ठळक मुद्देशॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज
मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या बंद दुकानातून धुराचे लोट निघत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. या बाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
वेळीच आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.