‘मॉलिवूड’कडून चित्रीकरणास पुन्हा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:29 IST2020-07-27T22:40:34+5:302020-07-28T00:29:24+5:30
मालेगाव मध्य : जगाच्या कानाकोपऱ्यात शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करणाºया मॉलिवूड चित्रसृष्टीने चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाºया लहान-मोठ्या कलाकारांना दिलासा मिळाला आहे.

‘मॉलिवूड’कडून चित्रीकरणास पुन्हा प्रारंभ
मालेगाव मध्य : (रशीद सय्यद ) जगाच्या कानाकोपऱ्यात शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करणाºया मॉलिवूड चित्रसृष्टीने चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाºया लहान-मोठ्या कलाकारांना दिलासा मिळाला आहे.
बॉलिवूडनंतर मालेगावफेम मॉलिवूडनिर्मित मालेगाव के शोले, मालेगाव का चिंटू या टीव्ही मालिकांमुळे देशात मालेगावच्या कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. अनेक लहान-मोठ्या कलाकारांना आपल्यातील कलेला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ पुन्हा प्राप्त झाले आहे. शहरातील लहान-मोठे कलाकार आपले काम करत छंद जोपासण्यासाठी आकर्षित झाले. त्यात त्यांना यशही प्राप्त झाले आहे. मॉलिवूडनंतर बदलत्या काळाची गरज लक्षात घेता येथील अनेकांनी यू-ट्यूब चॅनलकडे आपला मोर्चा वळविला. त्यात खान्देश फन, खान्देश झोन, सीक्रिटस्टार, पतंग प्रेमाचा, चिल्लर व खान्देश मुस्कान असे विविध यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविली. यातून आबालवृद्ध, महिला वर्ग असे लाखो चाहते याकडे आकर्षित करण्यात यश प्राप्त झाले. या क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी अनेक कलाकार, तांत्रिक कामगारांची परिस्थितीही जेमतेमच आहे. याचा विचार करून यातील अनेकांनी आपल्या सहकाºयांना लॉकडाऊन काळात मदतीचा हात दिला. मात्र शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी काही कामगारांनी केली आहे.