नाशिक : प्रेमसंबंधांना नकार देणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२२) गंगापूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अजित कैलास आहेर (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) आणि पीडित महिला हे एकमेकांचे ओळखीचे असून, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु फिर्यादी महिलेने अजितसोबत असलेले संबंध तोडून टाकले होते. असे असतानाही आरोपी अजितने फिर्यादी भवर टॉवरसमोर भाजीपाल घेत असताना रिक्षातून येऊन फिर्यादीस प्रेमसंबंध तोडल्याचा जाब विचारत वाद घातला. यावेळी त्याने मद्यपान केलेले होते. मद्यपान करून त्याने पीडितेस अर्वाच्य भाषेत डोक्यात दगड घालून मारहाणही केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मारहाणही केली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून संशयित आरोपीने मद्यपान करून महिलेला मारहाण केली. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धक्कादायक : प्रेमसंबध तोडले म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:12 IST