नाशिक : सिन्नर तालुक्यातील एका महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत घरात असलेल्या पतीला जळत्या अवस्थेत मिठी मारली. त्यामुळे पती-पत्नी गंभीररीत्या भाजले. यामध्ये उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, निमगाव येथे राहणा-या जिजाबाई पांडुरंग सानप (२८) असे या विवाहितेचे नाव आहे. जिजाबाईने राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविले. यावेळी घरात असलेले तिचे पती पांडूरंग सानप यांच्या सदर बाब निदर्शनास येताच त्यांनी पत्नीला विझविण्यासाठी धाव घेतली. पत्नीला विझविण्याचा प्रयत्न करत असताना जिजाबाईने त्यांना जळत्या अवस्थेत मिठी मारली. यामुळे पतीच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यामुळे दोघे गंभीररित्या भाजल्याची घटना बुधवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास घडली. भाजलेल्या अवस्थेत दोघांना उपचारार्थ जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान जिजाबाई यांचा गुरूवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने निमगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिजाबाई हिने स्वत:ला पेटवून घेण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत
धक्कादायक: अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जळत्या अवस्थेत पत्नीने पतीला मारली मिठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:04 IST
नाशिक : सिन्नर तालुक्यातील एका महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत घरात असलेल्या पतीला जळत्या अवस्थेत मिठी मारली. त्यामुळे पती-पत्नी गंभीररीत्या भाजले. यामध्ये उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, निमगाव येथे राहणा-या जिजाबाई पांडुरंग सानप (२८) असे या विवाहितेचे नाव आहे. जिजाबाईने ...
धक्कादायक: अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जळत्या अवस्थेत पत्नीने पतीला मारली मिठी
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील निमगाव येथे हळहळ उपचारादरम्यान जिजाबाई यांचा गुरूवारी मृत्यू पती-पत्नी गंभीररित्या भाजले