शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

कोरोनाला भरते धडकी, असे आमुचे गाव धामडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:12 PM

वैतरणानगर  : ना गावात जायला धड रस्ता आणि प्यायला पाणीही. कोरोनाच्या धडकी भरवणाऱ्या बातम्या पाहायला फोनला नेटवर्क नाही...अर्धवट ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावरचे मेसेजेस नाहीत... पण गावातल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळणारे इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ह्या आदिवासी वाडीचे ग्रामस्थ आहेत. कोरोना आल्यापासून धामडकीवाडीमध्ये शिक्षक जीव ओतून प्रशासनाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे राज्यभरात सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना धामडकीवाडी कोरोनापासून कोसो दूर आहे.

ठळक मुद्देशिक्षकांची जनजागृती : आदिवासी पाडा कोरोनापासून कोसो दूर

वैतरणानगर  : ना गावात जायला धड रस्ता आणि प्यायला पाणीही. कोरोनाच्या धडकी भरवणाऱ्या बातम्या पाहायला फोनला नेटवर्क नाही...अर्धवट ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावरचे मेसेजेस नाहीत... पण गावातल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळणारे इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ह्या आदिवासी वाडीचे ग्रामस्थ आहेत. कोरोना आल्यापासून धामडकीवाडीमध्ये शिक्षक जीव ओतून प्रशासनाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे राज्यभरात सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना धामडकीवाडी कोरोनापासून कोसो दूर आहे.शिक्षकांच्या जनजागृतीमुळे कोरोना लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला गैरसमजसुद्धा निघाला असून शुक्रवारी येथील ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने लस घ्यायलासुद्धा जाणार आहेत. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रमोद परदेशी यांच्या काळजीने ग्रामस्थ रोगमुक्त जीवन जगत आहेत. संपूर्ण लॉकडाऊन काळात ह्यटीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्नह्ण राज्यभर चर्चिला गेला. ह्या उपक्रमाचे श्रेयसुद्धा इथल्या शिक्षकांसह सजग ग्रामस्थांना द्यावे लागेल.इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या भावली धरणाच्या काठावर आदिवासी ग्रामस्थांची धामडकीवाडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावात जाण्यासाठी १ किलोमीटरची पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा येथील ग्रामस्थ आटापिटा करतात. विशेष म्हणजे ह्या गावात मोबाईल फोनला नेटवर्क नाही. सगळ्या जगात कोरोनाच्या हाहाकारापेक्षा सोशल मीडिया, बातम्यांचे चॅनेल यावर जास्त कहर आहे.धामडकीवाडी पॅटर्न प्रसिद्धजिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी हे प्रत्येक ग्रामस्थांच्या घरातील सदस्य बनलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कोरोना विरोधात प्रभावी जनजागृती केली. इथल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परदेशी यांनी ह्यटीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्नह्ण सुरू केला होता. ह्या उपक्रमामुळे ही वाडी राज्यभर प्रचलित झालेली आहे.गृहभेटी देऊन जनजागृतीफेब्रुवारीपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनमान धोक्यात आलेले आहे. म्हणून इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्या सूचनेनुसार गावागावात कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार धामडकीवाडी येथेसुद्धा सर्वेक्षण करून कोरोना आजाराची माहिती आणि जनजागृती करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक प्रमोद परदेशी व सहकारी शिक्षक दत्तू निसरड यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकूळ आगीवले, बबन आगीवले, खेमचंद आगीवले ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगीवले यांच्या सहकार्याने गृहभेटी देऊन जनजागृती सुरू आहे. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासHealthआरोग्य