विजेचा शॉक बसुन शेतकरी मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 19:46 IST2019-06-19T19:46:25+5:302019-06-19T19:46:54+5:30
खेडलेझुंगे : कोळगांव शिवारात माळचारी जवळ कुटुंबासह वास्तव्यास असणारे तरु ण शेतकरी गोविंद बाळासाहेब गवळी (३३) यांचा बुधवारी (दि.१९) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विजेचा जबर शॉक बसुन मृत्यु झाला.

गोविंद बाळासाहेब गवळी
ठळक मुद्दे उपजिल्हा रु ग्णालयाते नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खेडलेझुंगे : कोळगांव शिवारात माळचारी जवळ कुटुंबासह वास्तव्यास असणारे तरु ण शेतकरी गोविंद बाळासाहेब गवळी (३३) यांचा बुधवारी (दि.१९) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विजेचा जबर शॉक बसुन मृत्यु झाला.
त्यांच्या पाश्चात आई, पत्नी, साडेचार वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
शेतात पाणी भरत असतांना अनावधनाने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या केबलवर पाय पडल्याने गोविंद गवळी यांना विजेचा जबर धक्का बसला. उपचारार्थ त्यांना निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयाते नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
(फोटो १९ गवळी)