शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मनमाडला परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:18 AM

शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मनमाड : शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  वेद मंत्रोच्चाराच्या घोषात राम वैशंपायन, आबासाहेब दिंडोरकर, प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी चौक, महात्मा फुले चौकमार्गे काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा शिवाजी येथील दत्त मंदिरात समारोप करण्यात आला. संकेत जोशी यांनी पौरोहित्य केले.  प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शोभायात्रेस नितीन पांडे, राजाभाऊ पारिक, हर्षद गद्रे, सुनील केळकर, हेमंत लाळे, आनंद औटी, मकरंद कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, अंकुश जोशी, सतीश जोशी, प्रशांत जोशी, योगेश शर्मा आदींसह समाजबांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.यावेळी समीर कुलकर्णी, सौरभ देशपांडे, उमेश कुलकर्णी, निमिश बळेल, प्रसाद दिंडोरकर, आशुतोष गाडगीळ, सार्थक गाडगीळ, निरंजन कुलकर्णी, उदय कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, जितू शर्मा, मंगेश कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, आनंद काकडे, सोनू सजगिरे, चेतन गंगेले, प्रथमेश पाठक उपस्थित होेते.

टॅग्स :Nashikनाशिक