मनमाडला परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:18 IST2018-04-22T00:18:57+5:302018-04-22T00:18:57+5:30
शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मनमाडला परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा
मनमाड : शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेद मंत्रोच्चाराच्या घोषात राम वैशंपायन, आबासाहेब दिंडोरकर, प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी चौक, महात्मा फुले चौकमार्गे काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा शिवाजी येथील दत्त मंदिरात समारोप करण्यात आला. संकेत जोशी यांनी पौरोहित्य केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शोभायात्रेस नितीन पांडे, राजाभाऊ पारिक, हर्षद गद्रे, सुनील केळकर, हेमंत लाळे, आनंद औटी, मकरंद कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, अंकुश जोशी, सतीश जोशी, प्रशांत जोशी, योगेश शर्मा आदींसह समाजबांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.यावेळी समीर कुलकर्णी, सौरभ देशपांडे, उमेश कुलकर्णी, निमिश बळेल, प्रसाद दिंडोरकर, आशुतोष गाडगीळ, सार्थक गाडगीळ, निरंजन कुलकर्णी, उदय कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, जितू शर्मा, मंगेश कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, आनंद काकडे, सोनू सजगिरे, चेतन गंगेले, प्रथमेश पाठक उपस्थित होेते.