शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:55 AM

भगवान महावीर स्वामी की जय, अधर्म का नाश हो, अहिंसा धर्म की जयच्या जयघोषात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती.

नाशिकरोड : भगवान महावीर स्वामी की जय, अधर्म का नाश हो, अहिंसा धर्म की जयच्या जयघोषात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती.  भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी दुर्गा उद्यानसमोरील जैन स्थानक येथून एका सजविलेल्या रथात भगवान महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा आर्टिलरी सेंटररोड, खोले मळा, लिंगायत कॉलनी, देवळालीगाव, सत्कार पॉर्इंट, सुभाषरोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको, मुक्तिधाममार्गे जैन स्थानकापर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेत सहभागी झालेल्या जैन बांधवांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश व महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.कार्यक्रमास संघपती डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. पी.एफ. ठोळे, कन्हैयालाल कर्नावट, मोहनलाल चोपडा, लालाभाऊ जैन, शंकरलाल बोथरा, सुभाष घिया, राजेंद्र धाडीवाल, संजय चोपडा, किरणमल धाडीवाल, सुनील बेदमुथा, विजय चोरडिया, अजित संकलेचा, संजय सुराणा, संदीप ललवाणी, विक्रम कर्नावट, संतोष धाडीवाल, संदीप कर्नावट, प्रदीप लोढा, अशोक कोचर, प्रदीप कोठारी, मिलिंद चोरडिया, प्रतीक संघवी, योगेश भंडारी, चंदुलाल लुणावत, अ‍ॅड. सुशील जैन, रोशन टाटिया, विनोद झांबड, योगेश भंडारी, भूषण सुराणा आदी सहभागी झाले होते.जीवन चरित्रावर नाटिकाशोभायात्रेच्या सांगतेनंतर जैन स्थानकात प.पू. योगसाधनाजी म.सा. यांचे प्रवचन झाले. यावेळी पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर नाटिका सादर केली. भारतीय जैन संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी जैन भवनमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.४ भगवान महावीर जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली होती़ या मिरवणुकीत समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले़ विशेषत: लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मिरवणुकीतच मतदान जनजागृती अभियान राबविले़ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले़

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवNashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम