चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

By Admin | Updated: April 20, 2016 00:38 IST2016-04-19T22:26:43+5:302016-04-20T00:38:58+5:30

चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

Shobhayatra for Lord Mahavir Birthday Welfare Festival at Chandwad | चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

चांदवड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रा

 चांदवड : जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महावीरांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक गुजराथ गल्लीतील जैन मंदिरापासून सोमवारपेठ, श्रीरामरोड, वरचेगावमार्गे जैन स्थानकापर्यंत काढण्यात आली. ठिकठिकाणी जैन महिलांनी पालखीचे पूजन केले.
मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या जीवनावर पडलेल्या चौदा स्वप्नांच्या देखाव्याचा चित्ररथ होता. यात शीतल आबड, सौ. आबड व बालकलाकारांनी सहभाग घेतला, तर वरच्या गावातील दिगंबर जैन नवीन मंदिराजवळ समाजबांधवांच्या वतीने पाणी व सरबताची व्यवस्था केली होती. गौतम स्वामीजी का जाप व भगवान महावीर हमसे क्या चाहते है यावर प्रवचन झाले. यावेळी ध्यान योगी आचार्य सम्राट १००८ डॉ. शिवमुनी म.सा. , साधक गुरुदेव पूज्य हसमुखमुनी म.सा. परमविदुषी महासती, पूनितज्योती म. सा. इनकी सुशिष्या मधुर व्याख्याती, मधुर गायिका जागृती म.सा. एवं ध्यान साधिका वत्सलश्री म.सा. यांचे व्याख्यान झाले. यावेळी श्री आदर्श जैन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौतम प्रसादीचे वाटप करण्यात आले, तर सायंकाळी गुजराथ गल्लीतील जैन मंदिरात भक्तिसंध्येचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जैन मंडळातर्फे विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमास उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुंगरवाल, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जैन युवक मंडळाचे अध्यक्ष सुनील आबड, अशोकचंद आचलिया, राजकुमार संकलेचा, प्रवीण डुंगरवाल, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र कासलीवाल, मेहुल आचलिया, जवाहरलाल आबड, जवरीलाल संकलेचा, रमणलाल आचलिया, प्रकाश आबड, प्रवीण हेडा, मोरारजी ओस्तवाल, रवींद्र आबड, सुरेश कांकरिया, सुभाष श्रीश्रीमाळ, बाळासाहेब ललवाणी, शांतीलाल ललवाणी, मोहनलाल अजमेरा आदिंसह समाजबांधव, महिला, नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रममधील सर्व शिक्षक, मुली उपस्थित होते.

Web Title: Shobhayatra for Lord Mahavir Birthday Welfare Festival at Chandwad