सोनगाव सरपंचपदी शोभा कारे
By Admin | Updated: June 10, 2017 00:32 IST2017-06-10T00:32:26+5:302017-06-10T00:32:40+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगावच्या सरपंचपदी शोभा दीपक कारे यांची रोटेशन पद्धतीनुसार बिनविरोध निवड करण्यात आली.

सोनगाव सरपंचपदी शोभा कारे
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगावच्या सरपंचपदी शोभा दीपक कारे यांची रोटेशन पद्धतीनुसार बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते सरपंच पांडुरंग रामनाथ मुरादे यांनी आवर्तन पद्धतीनुसार सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल कारवाल, तलाठी संतोष हिरे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी डी. जे. कुमावत व कृषी उतपन्न बाजार समिती संचालक विजय कारे, उपसरपंच सरला रमेश शिंदे हेही उपस्थित होते. निवडणूक प्रसंगी रामदास खालकर, विश्वनाथ खालकर, अंकुश गायकवाड, अर्जुन काडेकर, सारिका खालकर, अंजनाताई कारे, शोभा गाडे, मंगल विखे उपस्थित होते तर यावेळी ग्रामस्थ विजय कारे, अंबादास कारे, चंद्रभान गावले, सुभाष कांडेकर, दीपक कांडेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.