पेठ पंचायत समितीत शिवस्वराज्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:50+5:302021-06-09T04:16:50+5:30

जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पंचायत समितीच्या इमारतीवर भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष ...

Shivswarajya Day in Peth Panchayat Samiti | पेठ पंचायत समितीत शिवस्वराज्य दिन

पेठ पंचायत समितीत शिवस्वराज्य दिन

जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पंचायत समितीच्या इमारतीवर भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपसभापती पुष्पा पवार, सदस्य तुळशीराम वाघमारे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, उपअभियंता अनिल भडांगे, विस्तार अधिकारी बापू सादवे, पाडवी, दुर्गा दरोडे आदी उपस्थित होते.

कोटंबी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रंजना वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच किरण भुसारे, शोभा भुसारे, मनिषा भुसारे, देवता चौधरी, घनश्याम चौधरी, पंढरीनाथ वाघमारे, पुंडलिक भुसारे, किसन गावीत, ग्रामसेवक मोहिनी दळवी, शशिकांत भुसारे, धनवंती भुसारे यांच्यासह रोजगारसेवक, ग्रामस्थ व आशासेविका आदी उपस्थित होते.

खोकरतळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर आकर्षक रांगोळी व फुलांनी सजावट करण्यात आली. सरपंच चंद्रभागा मोंढे यांच्या हस्ते प्रतिमा शिवस्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरंपच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

--------------------

पेठ पंचायत समितीत शिवस्वराज्य दिनानिमित्त उपस्थित भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे, पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, नम्रता जगताप, अमित भुसावरे, सरोज जगताप आदी. (०७ पेठ २)

===Photopath===

070621\07nsk_1_07062021_13.jpg

===Caption===

०७ पेठ २

Web Title: Shivswarajya Day in Peth Panchayat Samiti