वडांगळीत शिवसृष्टी साकारणार : कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:19 IST2021-08-25T04:19:04+5:302021-08-25T04:19:04+5:30

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व समाजाला आदर्शाची शिकवणूक देणाऱ्या संतांचा इतिहास वडांगळीत शिवसृष्टीच्या माध्यमातून साकारावा, यासाठी आमदार कोकाटे ...

Shivsrishti will be celebrated in Vadangali: Kokate | वडांगळीत शिवसृष्टी साकारणार : कोकाटे

वडांगळीत शिवसृष्टी साकारणार : कोकाटे

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व समाजाला आदर्शाची शिकवणूक देणाऱ्या संतांचा इतिहास वडांगळीत शिवसृष्टीच्या माध्यमातून साकारावा, यासाठी आमदार कोकाटे यांना खंडेराव खुळे, कैलास खुळे यांच्या नेतृत्वाखालील विलास उगले, विक्रम खुळे, बापूसाहेब खुळे, काळू खुळे, नाना बारकू खुळे, बाळासाहेब खुळे, योगेश खुळे, उत्तम खुळे आदींच्या शिष्टमंडळाने साकडे घातले.

आमदार कोकाटे यांना निवेदन देण्यात आले. त्यावर पंढरी खुळे, योगेश खुळे, चांगदेव खुळे, योगेश वाळझाडे, रमेश खुळे, प्रसाद भुसे, झुंबर तुपे, योगेश गुजराथी, अविनाश खुळे, शंकर गडाख, राजेंद्र सुके, देवीदास भुसे, निखिल कुलथे, राजेंद्र खुळे, राजेंद्र कुलथे, निलेश चुंबळे, शैलेश भुसे, अरुण कुलकर्णी, आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संत नामदेव महाराज, संत नरहरी सोनार, संत रोहिदास, संत गोरोबा कुंभार, भगवान विश्वकर्मा, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, भगवान एकलव्य आदींबरोबरच महाराष्ट्रातील विविध संतांचा जीवनपट या शिवसृष्टीच्या माध्यमातून दाखविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Shivsrishti will be celebrated in Vadangali: Kokate