शिवसेनेची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:19 IST2018-08-03T18:19:05+5:302018-08-03T18:19:35+5:30

त्र्यंबकेश्वर : हरसुल येथे तालुका शिवसेनेची बैठक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Shivsena's review meeting | शिवसेनेची आढावा बैठक

शिवसेनेची आढावा बैठक

त्र्यंबकेश्वर : हरसुल येथे तालुका शिवसेनेची बैठक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. अजुन कोणती कामे करावयाची शिल्लक आहेत, केलेली कामे निकृष्ट असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. तालुक्यातील मुख्य समस्या पाण्याची आहे. तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या किती योजना पुर्ण झाल्या, किती प्रलंबित राहिल्या, तर किती योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला याबाबत माहिती घेण्यात आली. या भ्रष्टाचाराबाबत किती फौजदारी गुन्हे दाखल झालेत व किती निधी वसुल झाला याबाबत सखोल माहिती घेण्यात येईल. तालुक्यातील आरोग्य शिक्षण कुपोषण आदी सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख संपतराव चव्हाण, समाधान बोडके, निवृत्ती लांबे, रवि वारूंगसे, नितीन लाखन, भुषण अडसर, धिरज पागी, शिवाजी कसबे , प्रमोद कोथमिरे, रामनाथ बोडके, मिथुन राउत , कमळु कडाळी, काशिनाथ वारघडे आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena's review meeting