शिवसेना शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:15 IST2018-03-03T00:15:43+5:302018-03-03T00:15:43+5:30

येणाया विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कनेते बबन थोरात यांनी मालेगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी केले.

 Shivsena Shiva Communication Campaign | शिवसेना शिवसंपर्क अभियान

शिवसेना शिवसंपर्क अभियान

मालेगाव : येणाºया विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कनेते बबन थोरात यांनी मालेगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी केले.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली व त्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. त्याचाच भाग म्हणून मालेगाव शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचा मेळावा झाला.  मेळाव्यात ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, सुहास कांदे यांनीही मार्गदर्शन केले. तालुकाप्रमुख संजय दुसाने यांनी प्रास्ताविक केले. संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले. युवा सेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांनी आभार मानले.  याप्रसंगी बंडूकाका बच्छाव, शहरप्रमुख रामभाऊ मिस्तरी, उपमहापौर सखाराम घोडके, कृउबा उपसभापती सुनील देवरे,  मनोहर बच्छाव, नीलेश आहेर, प्रमोद पाटील, भारत रायते, सुनील चांगरे, चंदू पठाडे, शशी निकम, यशवंत मानकर, केशव पवार, राजेश अलिझाड, भारत बेद, महिला आघाडीच्या जिजा बच्छाव, छाया शेवाळे, संगीता चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Shivsena Shiva Communication Campaign