कोरोना नियमांचे पालन करीत शिवजन्मोत्सवास परवानगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:23+5:302021-02-05T05:46:23+5:30

नाशिक : जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू नये ...

Shivjanmotsav allowed by following Corona rules! | कोरोना नियमांचे पालन करीत शिवजन्मोत्सवास परवानगी !

कोरोना नियमांचे पालन करीत शिवजन्मोत्सवास परवानगी !

नाशिक : जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शहर व जिल्ह्यात शिवजन्मोत्सव साजरा करावा, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिल्या.

पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील पारंपरिक मिरवणुका व कार्यक्रमांना परवानगी देण्यास प्राधान्य देण्यात येईल. शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार शिवजन्मोत्सवास परवानगी देण्यात येईल. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक असणार आहे. मिरवणुका काढतांना त्या वेळेत काढण्यात याव्यात आणि वेळेत संपविण्यात याव्यात. त्यामध्ये जास्त गर्दी होणार नाही, यासाठी काळजी सर्व मंडळांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती,नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भाेई समाज मित्र मंडळ, शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायाम शाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, सातपूर मराठा मित्र मंडळ , शिवमुद्रा प्रतिष्ठान, तसेच सर्व शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

नवीन मंडळांना नाही परवानगी

जुन्या पारंपरिक मंडळांना शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यास कोरोना नियमावलीनुसार परवानगी देण्यात आली असली तरी यंदा नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नवीन मंडळांना यंदा शिवजन्मोत्सव साजरा करण्यास किंवा चित्ररथांमध्ये सहभागी होण्यास देखील प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार नाही.

Web Title: Shivjanmotsav allowed by following Corona rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.