शिवडे ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:55 IST2020-01-31T23:53:56+5:302020-01-31T23:55:23+5:30

सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.

Shivde Gram Sabha resolution of drunkenness | शिवडे ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव

शिवडे ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव

ठळक मुद्दे महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.
गावात सहा ठिकाणी तर समृद्धी महामार्गाच्या परिसरात दोन अशा आठ ठिकाणी दारूविक्री सर्रास केली जात असल्याचा आरोप महिलांनी केला. गावात सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने मद्यपींचा उपद्रव वाढला असून दारूसाठी पैसे जमा करण्यासाठी लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार सुरू आहे. यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे दूषित झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
दारूबंदीसाठी पोलिसांनी गाव परिसरात गस्त वाढवावी व त्यांच्यावर वचक ठेवावा, यासाठी गावातील महिलांनी ग्रामसभेत हा विषय मंजूर करून घेतला. बेकायदेशीर दारूविक्री बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.
ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिल्या आहेत. यावेळी मंगल हारक, योगीता हारक, शकुंतला हारक, पल्लवी वाघ, कविता सोनकांबळे, कविता हारक, माया हारक, सीमा हारक, सुनीता हारक, विमल सोनकांबळे, आशाबाई सोनकांबळे, अरुण हारक, पोपट सोनकांबळे, उत्तम हारक, गोपाळ शिंदे, अर्जुन चव्हाणके, राजाभाऊ वाघ, उपसरपंच बुधाजी कातोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Shivde Gram Sabha resolution of drunkenness