शिवलिंग.ओम नम: शिवाय... हर हर महादेव...
By Admin | Updated: September 1, 2015 00:18 IST2015-08-31T23:54:34+5:302015-09-01T00:18:23+5:30
तिसरा श्रावणी सोमवार : कपालेश्वर, सोमेश्वर येथे भाविकांची गर्दी

शिवलिंग.ओम नम: शिवाय... हर हर महादेव...
पंचवटी : श्रावण मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शेकडो भाविकांनी सोमेश्वर आणि कपालेश्वर महादेव मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शेकडो भाविकांनी ओम नम: शिवाय, हर हर महादेवचा जयघोष करत महादेवाचे दर्शन घेतले. श्री कपालेश्वर भक्त परिवाराच्या वतीने सायंकाळी महादेवाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखी मिरवणुकीत शेकडो शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कपालेश्वर मंदिरात भाविकांनी भल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरांतील पुजाऱ्यांच्या वतीने महादेवाच्या पिंडींचे विधिवत पूजन करण्यात आले. पिंडींवर साजशृंगार करण्यात आला होता. भाविकांना विविध धार्मिक संस्था, तसेच मित्रमंडळांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
शहरातील मुक्तिधाम, भक्तिधाम, रामवाडी पुलाजवळील सर्वेश्वर, य. म. पटांगणावरील नीळकंठेश्वर, रामकुंडाजवळील बाणेश्वर, जनार्दन स्वामी आश्रम येथील शिव मंदिर, तीळभांडेश्वर येथील शिव मंदिर या ठिकाणीही भाविकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)