शिवचरित्राचा महाशिवरात्रीला समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:29 IST2020-02-23T16:29:13+5:302020-02-23T16:29:25+5:30
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथेमहाशिवरात्रीनिमित्तकिर्तनकारांनीशिवचरित्रसांगितले.शिवजयंतीलासुरूझालेल्यायामहोत्सवाचासमरोपमहाशिवरात्रीच्यादिवशीकरण्यातआला. चार दिवसांपासुन सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर तसेच संत महंत व नामवंत किर्तनकारांच्या तसेच परिसरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवचिरञमहोत्वसाचीसांगता करण्यात आली.

नांदूरवैद्य येथील शिवचिरञ कथेतील शिवलिंगाची पूजा करतानाचा जीवंत देखावा सादर करतांना नांदूरवैद्य येथील कलाकार
सिंहगडाचा तानाजीचा इतिहास सांगताना अनेकांनाअनेकांना अश्रू अनावर झाले.
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे जीवंत देखावे सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. गावातील मुलामुलींनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील भाषणे, तसेच आपल्या पहाडी आवाजात शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा संगितली. यानंतर कथाप्रवक्ते मनोहर महाराज सायखेडे यांच्या हस्ते चार दिवस वादनाला साथ दिलेल्या कलाकारांचा व बाल शाहिरांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी चार दिवस चाललेल्या या संगीतमय शिवचिरञ कथेवर आधारित प्रश्नमंजूशा कार्यक्र म करण्यात आला. याध्ये योग्य उत्तरे देणा-या भाग्यवंताला छञपती शिवाजी महाराज यांची सुंदर मुर्ती बिक्षस म्हणून देण्यात आली. शेवटच्या क्षणी भव्य शिवराज्यभिषेकाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. येथील दर्गाह समितीचे मोईन शेख यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.