नवी शेमळीत शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:25 IST2021-02-19T21:32:07+5:302021-02-20T01:25:35+5:30
जुनी शेमळी: नवीशेमळी येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून साजरी करण्यात आली.

नवी शेमळीत शिवजयंती साजरी
नवनिर्वाचित सरपंच सीमा बधान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवबा फ्रेंड सर्कल, गावातील आजी-माजी पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ, परिसरातील ग्रामस्थ़ पोलीस पाटील तसेच एकलव्य संघटहेच्या संयुक्त विद्यमाने महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.