देवळा येथे शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:55 IST2020-09-05T17:53:56+5:302020-09-05T17:55:36+5:30

देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रानौतच्या वक्तव्याचा निषेध करत चा देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena's shoe-throwing agitation at Deola | देवळा येथे शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याच्या निशेध करताना सुनील पवार, मनोज आहेर आदींसह शिवसैनिक.

ठळक मुद्देतालुक्यातील शिवसैनिक संतप्त

देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रानौतच्या वक्तव्याचा निषेध करत चा देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
कंगाणा रानौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तालुक्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी आक्र मक पवित्रा घेतला आहे. देवळा येथील पाच कंदील चौकात कंगनाच्या प्रतिमेस जोडे मारु न शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहर प्रमुख मनोज आहेर, विश्वनाथ गुंजाळ, नजीम तांबोळी, भास्कर आहिरे, सतीश आहेर, वसंत सूर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's shoe-throwing agitation at Deola