देवळा येथे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:08 IST2020-09-05T23:10:38+5:302020-09-06T01:08:19+5:30

देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रनौतच्या वक्तव्याचा निषेध करत देवळा तालुका शिवसेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena's 'Jode Maro' movement at Deola | देवळा येथे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

देवळा येथे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

ठळक मुद्देकंगना रनौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तालुक्यातील शिवसैनिक संतप्त

देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रनौतच्या वक्तव्याचा निषेध करत देवळा तालुका शिवसेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
कंगना रनौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तालुक्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. देवळा येथील पाच कंदील चौकात कंगनाच्या प्रतिमेस जोडे मारत शिवसैनिकांनी निषेध केला. यावेळी तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज आहेर, विश्वनाथ गुंजाळ, नजीम तांबोळी, भास्कर आहिरे, सतीश आहेर, वसंत सूर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's 'Jode Maro' movement at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.