इंधन दरवाढीविरोधात दिंडोरी तालुक्यात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:20 IST2020-12-13T23:17:46+5:302020-12-14T01:20:23+5:30
दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्याच्या लुटीविरोधात दिंडोरी तालुका शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत रविवारी पालखेड चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीविरोधात दिंडोरी तालुक्यात शिवसेनेचे आंदोलन
दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्याच्या लुटीविरोधात दिंडोरी तालुका शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत रविवारी पालखेड चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, युवा सेनेचे आदित्य केळकर, निलेश शिंदे, उपतालुका प्रमुख विश्वास गोजरे, प्रभाकर जाधव मोरे, अरुण गायकवाड, विजय पिंगल, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, जगन सताळे, जयराम डोखळे, नदीम सय्यद, नारायण राजगुरु, महिला तालुका संघटक सुवर्ण चुंबळे, महिला आघाडीप्रमुख अस्मिता जोंधळे, गट संघटक उज्ज्वला बोराडे, माजी उपसभापती वसंत थेटे आदींसह दिंडोरी तालुक्यातील शिवसेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.