पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:06 IST2021-02-06T18:05:31+5:302021-02-06T18:06:07+5:30

देवळा : केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळा येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येऊन ...

Shiv Sena's agitation against petrol and diesel price hike | पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देताना सुनील पवार, मनोज आहेर, देवानंद वाघ आदी. 

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन

देवळा : केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळा येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येऊन पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना केंद्र शासन बघ्याची भूमिका घेत आहे. केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यामुळे विंचूर-प्रकाशा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.               
यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोकोत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवानंद वाघ, मनोज आहेर, नंदकुमार जाधव, भारत देवरे, विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, विशाल आहेर,भास्कर पवार, आबा बोरसे, जितेंद्र भामरे, सतीश आहेर सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Shiv Sena's agitation against petrol and diesel price hike