शिवसेना म्हणते यंदा कोणतीही लाट नाही

By श्याम बागुल | Published: April 18, 2019 02:44 PM2019-04-18T14:44:57+5:302019-04-18T14:45:44+5:30

२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.

Shiv Sena says there is no wave this year | शिवसेना म्हणते यंदा कोणतीही लाट नाही

शिवसेना म्हणते यंदा कोणतीही लाट नाही

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय राऊत यांचा मुक्त संवाद : निवडणुकीत कस लागणार

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही, कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याच प्रमाणे २०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.


नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरूवारी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधान पदासाठी इच्छूक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छूक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते, निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी, पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीए मध्ये सर्व पक्षांनी एकत्र येवून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्यावर बोलताना राऊत यांनी, मोदी यांच्या सर्व सभा राजकीय असल्यामुळे ते ज्या राज्यात जातात तेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील असे सांगून राऊत यांनी, १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात जात, धर्माचा विषय तर येणारच असे सांगितले. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. रिपार्इंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येवून रालोआत सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Shiv Sena says there is no wave this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.